व्यवसाय म्हटले की मारवाडी, गुजराती, सिंधी, पारशी यांची नावे समोर येतात. देशातील कोणतेही राज्य घ्या त्या राज्यात तुम्हाला ही लोकं दिसणारच आणि त्यांचा व्यवसाय देखील जोमात सुरू असल्याचे दिसून येईल. एखाद्या ठिकाणे एकाने बस्तान बसविले की मग त्याचा भाऊ, त्याच्या मामाची, काकाची मुले आणि नातेवाईक देखील शहरात येतात. आणि थाटात व्यवसाय करतात. हीच लोक पुढे शहरात लाखो, कोट्यवधी रूपायांची प्रॉपर्टी देखील खरेदी करतात.

फक्त मारवाडी, गुजराती, सिंधी, पारशी धंद्यात एवढे यशस्वी का होतात? मराठी लोकांना ते का जमत नाही? याचीच कारणे आणि माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

सिंधी, मारवाडी, गुजराती यांनी पूर्ण महाराष्ट्रातील उद्योगधंदे काबीज केले आहे आहेत. बेकरी असो, कपड्यांचा व्यवसाय असो, हॉटेल, रेस्टॉरंट, हार्डवेअर असो की अगदी पाणीपुरी आणि भेल किंवा मेवाड आईसक्रिमचा गाडा असो सर्वत्र फक्त परप्रांतीय दिसतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मारवाडी, गुजराती, सिंधी, पारशी महाराष्ट्रातील किंवा इतर राज्यातील मार्केट कसे काबीज केले असा साधा प्रश्न आपल्याला पडतो. यासाठी अनेक कारणे आहेत.

महत्वाचे मुद्दे

फक्त व्यवसाय आणि त्यासाठी काहीही करण्याची तयारी

सिंधी, मारवाडी, गुजराती यांचे आयुष्यात धेय्य स्पष्ट असते. ते म्हणजे त्यांना व्यवसाय करायचा आहे. हे त्यांचे निश्चित असते. त्यांच्या पिढ्यानपिढ्या उद्योग आणि व्यापार त्यांच्या रक्तातच भिनला आहे. ही लोकं अधिक प्रमाणात व्यवसाय करताना दिसतात, तर बिहारच्या पट्ट्यात पाहिले तर तिकडेची मुले सरकारी नोकरीत अव्वल असल्याचे दिसते.

व्यवसाय करायचे निश्चित असल्यामुळे त्यासाठी कोणतेही कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. ही लोकं कोठेही राहतील, खाणे-पिणे, अय्याशी अशा फालतू गोष्टींसाठी पोटाला आणि मनाला चिमटा काढतील. कुठे मिळेल त्या जागेत थोड्याशा भांडवलात व्यवसाय सुरू करतील. भांडवल कसे मिळणार? जागा कोणती निवडावी? गिऱ्हाईक येतील का? पुढे कसे होईल? असे बाष्कळ प्रश्न त्यांना सतावत नाहीत. सर्वात महत्वाचे म्हणजे ते सुरूवात करतात.

मितभाषी आणि व्यवहारी (साधी राहणी मोठा व्यवसाय)

मारवाडी, गुजराती, सिंधी, पारशी लोकं कोणत्याही व्यवसायात असोत ती अत्यंत मितभाषी असण्यासोबत व्यवहारी देखील असतात. पुण्यात मोठ मोठाले बांधकाम प्रकल्प पाहिले तर ते सिंधी लोकांचे जास्त आहेत. आणि त्यांची मार्केटींग आणि विक्री कौशल्य अप्रतिम असते.

तसेच, कपड्याच्या व्यवसायात असणारे गुजराती किंवा मारवाडी लोक दुकानात आलेले कोणतेही गिऱ्हाईक माघारी जाऊ देत नाहीत. गिऱ्हाईकाने कितीही त्रास दिला तरी शांततेत त्यांची समजूत काढून आपले काम करण्याची त्यांची मानसिकता कौतुकास्पद असते. थोडक्यात साधी राहणी आणि व्यवसाय मोठा करणाऱ्यावर त्यांचा अधिक भर असतो.

विश्वास आणि नेटवर्क

कोणत्याही उद्योगात ग्राहकांचा विश्वास आणि त्या उद्योगाचे नेटवर्क महत्वाचे असते. अगदी पाणी पुरी खायची झाली किंवा समोसा, जलेबी घ्यायची झाली तरी आपण मारवाड्याचेच दुकान निवडतो. चांगला देतो तो असे म्हणून आपण त्या दुकानदाराला विश्वासाचे प्रमाणपत्र देऊन जातो. याच विश्वासाला ही लोकं देखील जपत असतात.

दुसरी गोष्ट म्हणजे नेटवर्क, मारवाडी, गुजराती, सिंधी, पारशी लोकं त्यांच्या व्यवसायाला लागणारे साहित्य त्यांच्याच नातेवाईक किंवा त्यांच्याच लोकांकडून घेतात. शिवाय कोणाकडून साहित्य खरेदी करतात याची माहिती कोणालाच देत नाहीत. तसेच, व्यवसाय सुरळीत झाला की लगेच दुसऱ्या ठिकाणी त्यांचे दुकान पाहायला मिळते. याचे गणित पुढे वाढत जाते.

मराठी माणूस कुठे कमी पडतो.

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील याची काळजी. तसेच, आपल्याकडे अनेक व्यवसाय जाती आणि धर्मात अडकून पडले आहेत. त्यातून बाहेर आलाच एखादा तर भांडवल, जागा यामध्ये अडकून पडतो. व्यवसाय सुरू केल्यानंतर मित्र, नातेवाईकांना यांच्यात सुरक्षित अंतर राखणे गरजेचे असते.

थोड्या यशाने हरळून जात आणि वारेमाप खर्च करण्याची मराठी लोकांची मानसिकता आहे. हौसेला मोल नसते म्हणते उधळपट्टी करायचे टाळायला हवे. कोणताही व्यवसायाला कमी न लेखता आत्मविश्वासाने आणि सर्व विचारांती सुरूवात करणे.

मारवाडी, गुजराती, सिंधी, पारशी लोकांकडून कोणत्या गोष्टी शिकाव्यात?

  • जिद्द, चिकाटीने कोणताही व्यवसाय कसा करावा.
  • ग्राहकांशी नाते कसे ठवावे, नाते आणि व्यवहार यातील फरक जाणून घेणे.
  • कामधंद्याची पद्धत व गुपित न सांगणे.
  • कितीही फालतू वेळ असेल तरी कामाव्यतिरिक्त कोणताही विचार करायचा नाही.
  • कोणताही धंदा करावा पण अगदी प्रामाणिकपणे करायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed