Goa Made Liquor Confiscated in Patan, Satara: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कराड-चिपळूण (Karad-Chiplun Road) मार्गावर पाटण तालुक्यातील गोषाटवाडी हद्दीत गोवा बनावटीचे (Goa Made Liquor Seized) विदेशी मद्य जप्त केले आहे. मद्यासह सहा चाकी व चार चाकी वाहन असा एकूण 19 लाख 75 हजार 400 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक किर्ती शेडगे यांनी दिली.

याप्रकरणी गोरखनाथ बाबुराव पवार (रा.बेलवडे खुर्द ता.पाटण), प्रदीप कृष्णात सलते (रा.मु.सलते पो. बीबी ता.पाटण) व दिनेश दगडू कदम (रा.वालोपे ता.चिपळूण जि.रत्नागिर) यांच्या विरुदध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65(अ)(इ), 81, 83, 90, 103 व 108 अन्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी कराड व पाटण तालुका परिसरात गोवा बनावट दारुचा पुरवठा करायचे.

या कारवाईमध्ये एकूण 25 बॉक्स गोवा बनावट दारु, एक सकस दुधाचे (Sakas Dairy) सहाचाकी वाहन, सकस दुधाची 553 कॅरेट तसेच एक चारचाकी वाहन असा एकूण रुपये 19 लाख 75 हजार 400 किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन 3 आरोपीं विरुदध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या कारवाईत निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक किशोर नडे, प्रशांत नागरगोजे, विनोद बनसोडे व महिला जवान राणी काळोखे, मनिष माने, आबासाहेब जानकर, राजेंद्र आवघडे यांनी सहभागी होते.

जिल्हयामध्ये बनावट दारु तसेच हातभट्टी दारु, गोवा बनावट दारु, तसेच इतर कोणत्याही प्रकारची बनावट निर्मिती, विक्री, वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ या कार्यालयास देण्यात यावी असे आवाहनही श्रीमती शेडगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed