Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh: छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं ब्रिटनच्या संग्रहालयातून महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. याबाबत ब्रिटन संग्रहायल आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात तीन वर्षासाठी सामंजस्य करारावर मंगळवारी (दि. 03 सप्टेंबर) स्वाक्षरी करण्यात आली.

लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवलेली वाघनखं महाराष्ट्र सरकार परत आणत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला ही तीच वाघ नख खरंच आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
1820 च्या दशकात ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकार्‍याने साताऱ्यात आणखी किमान तीन वाघ नख घेतल्याचे सांगितले जात आहे.

लंडन व्हिक्टोरिया आणि अर्बुट म्युझियमच्या वेबसाइटवरील वर्णनानुसार ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली होती का नव्हती याची पडताळणी करता येत नाही असे त्यात लिहिले आहे. 1818 मध्ये पेशव्यांच्या पडावानंतर मराठ्यांच्या पेशवे पंतप्रधानांनी साताऱ्यात जेम्स ग्रँट डफ यांना ‘वाघनख ‘ दिली होती, असे सांगितले जाते.

कशी गेली वाघनख लंडनला?

व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी जेम्स ग्रँट डफ यांना ही वाघनखं भेट देण्यात आली होती. डफ यांची 1818 मध्ये तत्कालीन सातारा संस्थानाचे राजकीय प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मराठा साम्राज्याच्या तत्कालीन पेशव्याने ही वाघनखं डफला भेट म्हणून दिली होती. पुढे डफच्या वंशजाने वाघनखं लंडनमधील या संग्रहालयाला भेट म्हणून दिली.

दरम्यान, महाराष्ट्रात येणाऱ्या या वाघनखांवरुन राज्यात वाद सुरु झाला आहे. ब्रिटनमधून आणण्यात येणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहेत का आणि ती कायमस्वरूपी भारतातच राहणार का? असा सवाल शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. वाघनखं भारतात कायमस्वरूपी परतावी आणि महाराष्ट्रातील संग्रहालयात सर्वांसाठी प्रदर्शित होतील याची काळजी महाराष्ट्र सरकारने घ्यावी, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सरकारच्या वाघनखासंदर्भातील दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, लंडनमधली वाघनखे शिवछत्रपतींची नाहीत, सरकारने लोकांची दिशाभूल करू नये असे सावंत यांनी म्हटले आहे.

अफजलखानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे इ.स. 1919 पर्यंत साताऱ्यात असलेल्या नोंदी आणि छायाचित्र उपलब्ध आहेत. मग तर इ.स 1919 च्या अगोदरच व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये जमा झालेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असूच शकत नाही, असा दावा इंद्रजित सावंत यांनी केला आहे.

कधी कुठे असणार वाघनखं ?
16 नोव्हेंबर – वाघनखांचे मुंबईत आगमन
17 नोव्हेंबर- साताऱ्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात वाघनखांची स्थापना
17 नोव्हेंबर 2023 ते 24 ऑगस्ट 2024 – साताऱ्यात प्रदर्शन
15 ऑगस्ट 2024 ते एप्रिल 2025 – वाघनखं नागपूर येथील शासकीय संग्रहालयात ठेवली जाणार.
एप्रिल 2025 ते नोव्हेंबर 2025 – वाघनखं कोल्हापूर येथील शासकीय संग्रहालयात ठेवली जाणार.
नोव्हेंबर 2025 ते नोव्हेंबर 2026 – वाघनखं मुंबईतील छ्त्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवली जातील.
16 नोव्हेंबर 2026 रोजी वाघनखे पुन्हा लंडनला व्हिक्टोरिया आणि गिल्बर्ट वस्तुसंग्रहालयात पाठवली जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed